अक्कलकोट : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे व तालुका अध्यक्ष शंकर म्हेत्रे यांचे वडील सातलिंगप्पा संगप्पा म्हेत्रे शनिवारी अनंतात विलिन झाले. आज शनिवारी दुपारी चार वाजता जनसमुदायाच्या उपस्थितीत आणि शोकाकुल वातावरणात दुधनी येथील शेतात सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
यावेळी सोलापूर जिल्हा , अक्कलकोट तालुक्यातील व कर्नाटकातील काँग्रेसचे बडे नेते, जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते. सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव देह दुधनी येथे घराजवळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. पुत्र माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, मल्लीनाथ म्हेत्रे, शिवराज म्हेत्रे, प्रथमेश म्हेत्रे, मुली, सुना ,नातवंडे व म्हेत्रे परिवारातील सदस्यांना दुःख अनावर झाले होते. ज्येष्ठ नेत्याच्या आठवणींनी वातावरण शोकाकुल झाले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, अबे तुमकूरुचे महास्वामी, हिरे जेऊरगी मठाचे जयगुरु शांतलिंग महास्वामी, बडदाळचे चन्नमल शिवाचार्य महास्वामी, नागणसूर मठाचे रेवणसिध्देश्वर महास्वामी, दुधनी विरक्त मठाचे डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामी, अफजलपूरचे आमदार एम वाय पाटील, आमदार यशवंत गौडा पाटील, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, आळंदचे माजी आमदार डी आर पाटील यांची उपस्थिती होती.
तसेच तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख, शिवशरण पाटील, सुरेश हसापुरे, चेतन नरोटे, अमोलराजे भोसले, बसलिंगप्पा खेडगी, महादेव कोगनूरे, मल्लिकार्जुन काटगांव, मल्लिकार्जुन पाटील, दुधनी चे नगराध्यक्ष भिमाशंकर इंगळे, माजी सभापती सुरेखा काटगाव, गुरूशांत पाटील, मोतीराम राठोड, सिध्दाराम भंडारकवठे, ,विलास गव्हाणे,उत्तम गायकवाड, बाळासाहेब शेळके,कर्नाटक भाजपा जिल्हाध्यक्ष दौडप्पागौडा पाटील, जावई उद्योगपती बोरकर, शरणगौडा पाटील, केदार उंबरजे, पक्षनेता आनंद सोनकांबळे, दत्ता शिंदे, मंगल पाटील, सुनिता हडलगी, भीमाशंकर कापसे, दिलीप बिराजदार यांच्यासह अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील आणि कर्नाटकातील गुलबर्गा, अफजलपूर,आळंंद, सिंदगी,जेऊरगी येथील लोकांची उपस्थिती होती.