अमरावती : केंद्र सरकारने कृषी विषयक विधेयके मंजूर करुन घेत त्याचे कायद्यांमध्ये रुपांतर केले. कृषी कायद्यांबद्दल लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. मोदीजी जसे 56 इंच छाती छाती असल्याचे सांगतात त्याप्रमाणे त्यांनी या बिलात केवळ दोन ओळी टाकाव्यात, आम्ही भाजपमध्ये प्रवेश करु, असे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती येथे बोलताना सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिवसेनेने केंद्रातील भाजप सरकारने कृषी विधेयकांना पाठिंबा दिला तर राज्यसभेत सभात्याग केला. याविषयी बोलताना बच्चू कडूंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मोदी सरकारने दोन वाक्यांचा समावेश केल्यास हे कृषी विषयक कायदे जसेच्या तसे स्वीकारायला तयार आहोत, असे बच्चू कडू म्हणाले.
काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सोयाबीन पिकाची पाहणी केल्यानंतर कृषी विभाग झोपल्याची टीका करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला होता.
* या दोन वाक्याची भर
नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना 50 टक्के नफा मिळवून भाव देण्याचे आश्वासन दिले होते. 50 टक्के नफा धरुन हमीभाव शेतकऱ्यांना गेल्या 10 वर्षात मिळालेला नाही. कृषी विधेयकांद्वारे शेतकऱ्यांना ताकद द्यायची असेल, शेतकऱ्यांविषयी सद्भावना असेल तर मोदी सरकारने कृषी कायद्यांमध्ये शेतमालाला 50 टक्के नफा धरुन हमीभाव जाहीर करणे आणि हमीभावानुसार शेतमाल खरेदी करणे, या दोन वाक्यांच्या समावेश करावा. मोदी सरकारने या दोन वाक्यांचा कृषी कायद्यात समावेश केल्यास भाजपमध्ये प्रवेश करु, असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.