नवी दिल्ली : बिहारमधील दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिग्विजय सिंह यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. श्रेयसी सिंह सुवर्ण पदक विजेत्या शूटर आहेत. त्यांनी भाजप नेते भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत भाजपचं प्राथमिक सदस्यत्व स्वीकारलं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर श्रेयसी सिंह यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
श्रेयसी सिंह यांची आई पुतुल सिंह खासदार होत्या. त्यांचे वडील जॉर्ज फर्नांडीस यांचे सहकारी आणि जनता दलाचे नेते होते. नंतर ते समता पार्टीत गेले. त्यांनी काहीवेळा बिहारच्या बांका लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व देखील केलं होतं. तसेच ते दोनदा राज्यसभेवरही निवडून गेले. त्यांची मुलगी श्रेयसी सिंह यांनी भाजपचे महासचिव अरुण सिंह आणि बिहार भाजपचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला. श्रेयसी सिंह बिहारसभा विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणूक रिंगणार असणार आहेत.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तिरंदाज राहिलेल्या श्रेयसी सिंह यांच्या राजकीय सक्रियतेबाबत अनेक दिवसांपासून चर्चा होती. मात्र, या सर्व चर्चा नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडून निवडणूक लढवण्याच्या होत्या. आता मात्र त्यांनी भाजप प्रवेशांवर शिक्कामोर्तब केला. श्रेयसी यांना 2018 मध्ये राष्ट्रमंडल स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाले होते.