लखनौ : आम आदमी पक्षाचे (आप) खासदार संजय सिंह, हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रकार घडला. पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या हाथरसमध्ये जात आहेत. संजय सिंहदेखील पीडितेच्या कु़टुंबियांना भेटायला गेले होते. त्यावेळी कुटुंबियांना भेटून बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर अचानक शाई फेकण्यात आली. यावरुन हथरस पीडित कुटुंबियास भेटण्यासाठी आणखी छुपा विरोधच असल्याचे स्पष्ट होत आहे.
हाथरसमध्ये आज सोमवारी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने शाई फेकली. सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी संजय सिंह हाथरसमध्ये गेले होते, त्यावेळी ही घटना घडली. पीडित तरुणीचा मागच्या आठवड्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हाथरसला गेलेले संजय सिंह, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन घरातून बाहेर पडल्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या अंगावर शाई फेकली. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या नेत्याच्या शिष्टमंडळाने पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना धीर दिला.
कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर घराबाहेर संजय सिंह प्रसारमाध्यमांशी बोलत असताना तिथे असलेल्या एका व्यक्तीने संजय सिंह यांच्या अंगावर शाई फेकली. त्याचवेळी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्या व्यक्तीला पकडले व ताब्यात घेतले.
* शासनकाळातील काळा दिवस
घडलेल्या प्रकारानंतर परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण होते. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासन आणि उत्तर प्रदेश सराकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आप पक्षाच्या उत्तर प्रदेश विभागाने, हा दिवस योगी आदित्यनाथ यांच्या शासनकाळातील काळा दिवस म्हणून नोंदवला जाईल, असे म्हणत निषेध व्यक्त केला. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडून सामान्यांचे दमन केले जात असल्याचा आरोपही आप पक्षाने केला. हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना भेटायला गेले असता पोलिसांडून अडवले जात असून मारले जात आहे, असेही आप पक्षाचे कार्यकर्ते म्हणाले. योगी आदित्यनाथ यांचे उत्तर प्रदेश सरकार दोषींना वाचवू पाहत असल्याचा आरोपही आप पक्षाने केला आहे.