मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?, असा थेट सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.
सुशांतसिंग प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचं काम भाजपाने केले. महाराष्ट्र पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते फारच दुःखद आहेत. महाराष्ट्राची बदनामी केल्याप्रकरणी भाजपाने राज्यातील जनतेची माफी मागितली पाहिजे, नाही तर जनता त्यांना माफ करणार नाही, असंही राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्राची बदनामी केली. त्यासंदर्भात माझा देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न आहे की, ते गुप्तेश्वर पांडेंच्या प्रचाराला जाणार का?, बिहारचे पोलीस प्रमुख जे होते, ते आता निवडणूक लढवत आहे, फडणवीस हे निवडणूक प्रभारी आहेत. माझा प्रश्न आहे की फडणवीस हे या अधिकाऱ्याच्या निवडणूक प्रचाराला जाणार का?, असं म्हणत गृहमंत्र्यांनी थेट फडणवीसांवर निशाणा साधला.
ज्यांनी 5 वर्षे राज्याचं नेतृत्व केलं ते फडणवीस यांनीही मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता, असं म्हटलं आहे. त्यामुळे माझे त्यांना दोनच प्रश्न आहेत. पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्यांनी राज्याची माफी मागितला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असंही म्हणत अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीसांना फटकारलं आहे.