पुणे : एक विचित्र अपघात पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर समोर झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर नवले पुलाजवळ तब्बल 15 गाड्यांचा एकत्र अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या भीषण अपघातात शुभम प्रकाश सुपेकर (24, रा. नर्र्हे, संगमनेर ) असे एक नाव मृत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नवले पुलाजवळ 15 गाड्या एकमेकांना धडकल्या. भर दिवसा असा विचित्र अपघात झाल्यामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतं. थोड्या वेळ वाहतूक कोंडीदेखील झाली होती. हा अपघात नेमका कसा झाला याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
सकाळची साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कात्रज देहू रोड बाह्यवळण सतत रस्त्यावर गर्दी असते. त्यावेळी अचानक पाठीमागून एक ट्रक भरधाव वेगात बाबाजी पेट्रोल पंपासमोर आला आणि त्याचे पुढचे डाव्या बाजूचे टायर बस्ट झाला. त्यातच ब्रेक फेल झाले व त्याने समोर गर्दीमुळे हळू जाणाऱ्या वाहनांना उडविण्यास सुरुवात केली.
मिळालेल्या माहितीनुसार, घटना घडताच स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना आणि बचाव कार्यासाठी अधिकाऱ्यांना पाचारण केलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघाती वाहन चालकांची चौकशी सुरू केली आहे. विचित्र पद्धतीने एकमेकांना धडकल्या आहेत.
दरम्यान, पोलिसांनी रस्त्यामधील वाहनं बाजूला करण्याचं काम सुरू केलं असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी 3 जणांचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली नाही.