हाथरस : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मंगळवारी उत्तर प्रदेशातील हाथरसच्या पीडित युवतीच्या कुटुंबियांची बुलगडी या गावातील घरी जाऊन भेट घेतली.
यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला रिपब्लिकन पक्ष संरक्षण देणार असल्याचं सांगितलं. तसेच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सांगून या परिवाराला पोलीस संरक्षण देणार असल्याचंही म्हटलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
रिपब्लिकन पक्षातर्फे पीडित कुटुंबाला सांत्वनपर 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा करण्यात आली. पीडित दलित युवतीच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत रिपब्लिकन पक्ष या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असं आश्वासन रामदास आठवले यांनी दिलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी रामदास आठवले यांना फोन करून हाथरस प्रकरणावर चर्चा केली होती.
जिथं जिथं दलित अत्याचार होईल तेथे मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचं शिकवू नये, असंही आठवले यांनी म्हटलं होतं.