नवी दिल्ली : कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर रेल्वेसेवा ठप्प झाली होती. आता हळूहळू स्पेशल ट्रेन सुरू करण्यात येत आहेत. नव्याने 39 स्पेशल ट्रेन सुरू केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. रेल्वे मंत्रालयानं या रेल्वेंची यादी जाहीर केली असून अद्याप तारीख घोषित केलेली नाही. नव्या 39 रेल्वे सुरु करण्याबाबतच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील.
रेल्वे बोर्डाने विभागांना 39 ट्रेन सुरु करण्यास परवानगी दिली आहे. या रेल्वे सेवा कधी सुरु करण्यात येतील याची माहिती लवकरच देऊ, असंही रेल्वे मंत्रालयाने म्हटलं आहे. देशभरात सुरु करण्यात येणाऱ्या 39 ट्रेन्समध्ये मुंबईतून एलटीटी, बांद्रा, मुंबई सेंट्रल इथून आणि पुणे, नागपूर इथूनही एक्स्प्रेस सुरू होणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशातील कॉर्पोरेट सेक्टरमधील पहिली ट्रेन तेजस एक्सप्रेस 17 ऑक्टोबरपासून सुरू होईल. आयआरसीटीसीकडून या व्हीआयपी ट्रेनचं बूकिंग 8 ऑक्टोबरपासून सुरू करणार आहे. एक वर्षापूर्वी लखनऊ ते दिल्लीसाठी तेजस सुरू करण्यात आली होती. अत्याधुनिक सुविधा असलेली ही ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरली होती. याशिवाय अशी ट्रेन आहे की जी उशीर झाल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई देते.
* महाराष्ट्रात स्पेशल ट्रेन
महाराष्ट्रात मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 9 ऑक्टोबरपासून मुंबई, नागपूर, पुणे, गोंदिया आणि सोलापूर इथून पाच स्पेशल ट्रेन सुरू केल्या जाणार आहेत. या सर्व ट्रेन या आरक्षित असणार आहेत. तसंच प्रवाशांना कोरोनाशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचं पालन करणं बंधनकारक असेल. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर अनिवार्य असेल. याबाबत प्रवाशांना रेल्वेनं सूचना केल्या आहे