शिमला : मेघालय व नागालँडचे माजी राज्यपाल व सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांनी त्यांच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला आहे. हिमाचल प्रदेशमधील शिमला येथील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अश्विनी कुमार यांनी सीबीआय मर्डर केसचा तपास केला होता. ते पंजाबकडून राज्यसभेवर खासदार म्हणूनही गेले होते.
सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांनी आपल्या शिमला येथील राहत्या घरी आत्महत्या केली आहे. अश्विनी कुमार यांनी मणिपूर नागालँडचे गव्हर्नर म्हणून देखील जबाबदारी सांभाळली होती. अश्विनी कुमार यांच्या आत्महत्येबाबत शिमल्याचे पोलीस अधिकांश मोहित चावला यांनी एका नामांकित वृत्तसंस्थेला माहिती दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अश्विनी कुमार पोलीस अधिकाऱ्यांसाठी आदर्श होते त्यांचा मृत्यू अशाप्रकारे होणं ही घटना अत्यंत दुःखद आहे, अशी प्रतिक्रिया मोहित चावला यांनी दिली. शिमल्याचे पोलीस अधिक्षक मोहित चावला यांनी धक्कादायक घटना घडल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. सीबीआयचे माजी संचालक असलेले अश्विनी कुमार हे नागालँड मणीपूरचे माजी राज्यपालही होते. अश्विनी कुमार यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अजून समोर आलेलं नाही. शिमल्यामधले पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.