कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे मंदिर, नृसिंहवाडी, श्री जोतिबा यासह सर्वच मंदिरे नवरात्रौत्सवातही दर्शनासाठी बंदच राहणार आहेत. याबाबत कोणताही निर्णय अद्याप राज्य शासनाने घेतलेला नाही. त्यामुळे सध्या तरी बंद मंदिरात नवरात्रौत्सवाचे पारंपरिक व धार्मिक विधी प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहेत. यंदा साडेतीन खंडपीठात पैकी एक असलेल्या कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार नाही.
शासनाच्या सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करून हे सर्व पारंपरिक विधी होतील. प्रतिवर्षा प्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विविध विभागांनी नवरात्रौत्सवाचा सोहळा सुरळीत व्हावा, यासाठी सहकार्याचे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने नवरात्रौत्सवाच्या नियोजनासंदर्भात बैठकी झाली. शिवाजी पेठेतील देवस्थान समितीच्या मुख्य कार्यालयात बैठक झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचना व आवाहनानुसार इतर सणांप्रमाणेच नवरात्रौत्सवही पारंपरिक पद्धतीने गर्दी टाळून साधेपणाने उत्सव साजरा करण्याबाबात यावेळी चर्चा करण्यात आली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना संसर्गामुळे मंदिरातील सर्व धार्मिक विधी हे शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. नवरात्रौत्सवाच्या काळात रोज होणारी पालखी, तसेच ललित पंचमी आणि दसरा सोहळा यासाठी शासनाच्या नियमानुसार व अटींची पूर्तता करून सर्व धार्मिक विधी करण्यात येणार असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले.
* देवस्थान समितीची पूर्वतयारी
नवरात्र उत्सव जवळ येऊ लागल्या असल्याने देवस्थान समिती कार्यालयात पोलीस प्रशासन, वीज मंडळ, महानगरपालिका, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, दूरसंचार, पुजारी, सेवेकरी, सुरक्षा यंत्रणा यांच्या समवेत वेगवेगळ्या बैठक झाली.उत्सव काळात रोज होणारी पालखी, तसेच ललित पंचमी आणि दसरा सोहळा यासाठी शासनाच्या नियम व अटींची पूर्तता करून सर्व धार्मिक विधी करण्यात येणार आहेत, असे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले.
शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर बंद राहणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे बुधवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तर, हा उत्सव मंदिर अंतर्गत साजरा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात नियोजनाची बैठकीत मंदिरातील सर्व धार्मिक विधी शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.