सोलापूर : सोलापूरसाठी एक धक्कादायक बातमी आहे. भारत – चीन सीमेवर कर्तव्यावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील एका जवानाचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वार्ता समजताच सोलापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कमलापूर (ता. सांगोला) येथील अमित श्रीरंग आदलिंगे (वय ३०) या जवानाचा कोरोना संसर्गजन्य आजारामुळे काल बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास कर्तव्यावर असताना सिक्कीम येथे मयत झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
२०१२ साली हैदराबाद येथे अमित श्रीरंग आदलिंगे हे भारत तिबेट सीमा पोलीसमध्ये भरती झाले होते. ते सध्या भारत-चीन सीमेवर कर्तव्यावर असताना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याचा अंत्यविधी भारत तिबेट सीमा पोलीस सिक्कीम मध्येच करणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.