मुंबई : ठाकरे सरकारचे येत्या काही दिवसात तीन विकेट पडणार, असं भाकित भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी वर्तवलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर जेलमध्ये जाणार आणि परिवहन मंत्री अनिल परब देखील म्हाडा जमीनप्रकरणी घरी बसणार, असंही किरीट सोमय्या यांनी भाकित व्यक्त केले आहे.
किरीट सोमय्या हे अनंत करमुसे मारहाण प्रकरणी आज ठाणे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आले होते. अजूनपर्यंत जितेंद्र आव्हाड यांना कधी जेलमध्ये टाकणार, असा सवाल यावेळी त्यांनी केला. त्यांना अटक का होत नाही, असेही त्यांनी विचारले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजप नगरसेवक मनोहर डुंबरे देखील उपस्थित होते. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एसआरए प्रकरणात खोटे बोलत आहे. तर, याबाबत आम्ही पुढे जनहित याचिका टाकणार असल्याचे सांगितले.
टीआरपी प्रकरणात ठाकरे सरकार आणि अनिल देशमुख त्या चॅनेलवाल्यांना का घाबरत आहेत. एफआयआरमध्ये दुसरेच नाव आहे. तसेच, ठाकरे सरकार आल्यापासून गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये टाकण्याची का धडपड करत आहेत, असंही ते म्हणाले. विरोधी पक्ष म्हणून आम्ही ‘कोव्हिड-19’मध्ये पूर्ण जबाबदारीने काम करत आहे. कोव्हिड-19 मध्ये किती जण मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे हे सरकार त्यांच्या पापाने पडणार, असा खोचक टोला किरीट सोमय्या यांनी यावेळी लगावला आहे.