सोलापूर : मराठी भाषेला अधिक समृध्द करण्यासाठी चार तप विदर्भाच्या श्रीमंत अरण्यात साहित्य साधना करणारे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली नागपूर सोडून सोलापूरला राहायला येत आहेत. त्यांच्या सोलापूरला परत येण्याच्या वृत्तामुळे सोलापूरच्या साहित्य वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वयोमानानुसार आवश्यक असलेल्या सुश्रुषेच्या कारणास्तव ते नागपूर सोडून सोलापूर येथे स्थलांतर करत आहेत. सोलापूर आल्यानंतर पुन्हा लेखनाला भिडेन, असे त्यांनी नागपूर सोडताना झालेल्या सत्कार सोहळ्यात सांगितले.
सोलापूर येथे 2006 झालेल्या 79 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व प्राणी, पक्षी, जंगल याचे विश्व वाचकांसमोर हळूवार उलघडून ठेवणारे साहित्यिक मारुती चितमपल्ली हे मुळेचे सोलापूरचे आहेत. मराठी भाषेला एक लक्ष नवे शब्द देणारे “शब्दप्रभू’ नोकरीच्या निमित्ताने विदर्भात गेले. तिथल्या जंगलाशी त्यांची नाळ इतकी घट्ट जुळली की जवळजवळ 48 वर्षे ते विदर्भात राहिले.
* त्यांची साहित्य संपदा
त्यांनी आजवर त्यांनी “केशराचा पाऊस’ “घरट्यापलीकडे’, “चकवाचांदण : एक वनोपनिषद’, (आत्मचरित्र) “चित्रग्रीव – एका कबुतराची कथा’ “चैत्रपालवट’ “जंगलाचं देणं, “पाखर माया’, “आनंददायी बगळे’, “निसर्गवाचन’, चैत्रपालवी, नवेगावबांधचे दिवस आदी पुस्तके लिहिली आहेत. याशिवाय पक्षीकोश प्रसिध्द झाला आहे. वृक्षकोषाचे काम सुरू, वृक्षकोशचे काम सुरू मत्स कोशाचाही त्यांनी संकल्प सोडलेला आहे.