नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या ‘नीट’ परीक्षेचा निकाल 16 ऑक्टोबर जाहीर केला जाणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएकडून सोमवारी देण्यात आली. एनटीएनिट डॉट एनआयसी डॉट इन या वेबसाईटवर विद्यार्थी निकाल पाहू तसेच डाऊनलोड करू शकतात, असे एनटीएकडून सांगण्यात आले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कंटेन्मेंट झोनमधील असंख्य विद्यार्थ्यांना नीट परीक्षा देता आली नव्हती. अशा विद्यार्थ्यांसाठी 14 ऑक्टोबरला नीट परीक्षेचे आयोजन करावे, असे निर्देश एनटीएला देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गामुळे नीट परीक्षाच तर बहुतांश स्पर्धा परीक्षा टळल्या होत्या. सामाजिक दुरत्वाचे पालन करीत 13 सप्टेंबर रोजी नीट परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* 14 ऑक्टोबरला पुन्हा नीट परीक्षा
नीट परीक्षेला बसणारे लाखो उमेदवार त्यांच्या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, आता विद्यार्थ्यांना थोडा वेळ पाट पहावी लागणार आहे. कारण, कोरोना संक्रमीत विद्यार्थ्यांसाठी 14 ऑक्टोबरला पुन्हा नीट परीक्षेचे आयोजन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मान्याता दिली आहे. 13 सप्टेंबर कोरोना संक्रमनामुळे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. त्याच्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दीली आहे. त्यामुळे नीट परीक्षेचा निकाल आता 16 ऑक्टोबर जाहीर केला जाणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) नीट 2020 चा निकाल आपल्या अधिकृत वेबसाइट ntaneet.nic.in वर जाहीर करू करेल.