मुंबई : मुंबई पोलिसासह ठाकरे सरकारला बाबरसेना असा शेरा मारणा-या कंगनाने हाताश होऊन मुंबई सोडल्याचे ट्वीट केले. मात्र कंगनाचा मुंबईचा लळा काही केल्या कमी होताना दिसत नाही. तिने परत सोयीनुसार राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या पत्रव्यवहार वादात उडी घेतलीय.
राज्यातील हॉटेल, बार उघडण्यात आले असताना मंदिरं बंद का? असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, या पत्रातून राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही, असे म्हणत पत्रानेच उत्तर दिले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या या पत्रावरून बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने पुन्हा ठाकरे सरकावर बोचरी टीका केली आहे. याबाबत कंगनाने ट्विट केले आहे. राज्यपालांकडून गुंडा सरकारला प्रश्न विचारला आहे, याबद्दल चांगले वाटले. गुंडांनी बार आणि रेस्टॉरंट उघडले. मात्र, राजनीतिकदृष्ट्या मंदिरं बंद ठेवली. बाबर सेनेपेक्षा सोनिया सेना वाईट वागणूक देत आहे, असे कंगना राणौतने ट्विटमध्ये म्हटले आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून कंगना राणौतने याआधी मुंबई पोलिस आणि राज्य सरकारवरही बोचरी टीका केली होती. कंगना राणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर एकेरी भाषेत टीका करत शिवसेनेशीही पंगा घेतला आहे. याशिवाय, कंगना राणौत मुंबईची तुलना पीओकेशी केली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगना राणौतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्यामुळे एका नव्या वादास तोंड फुटले होते. त्यानंतर आता पुन्हा ठाकरे सरकारवर टीका केल्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे.