मुंबई : शिक्षण संपवून सरकारी नोकरीची आशा उरी बाळगून असणा-या युवकांसाठी खुशखबर आहे. भारतीय टपाल खात्यात मोठी भरती निघाली आहे. विशेष म्हणजे या सर्व जागा महाराष्ट्र विभागासाठी असून, अर्ज करण्यासाठी नोटिफिकेशनही जारी करण्यात आले आहे.
भारतीय पोस्ट खात्याच्या महाराष्ट्र विभागासाठी एकूण 1 हजार 371 जागा निघाल्या आहेत. या सर्व जागा वेगवेगळ्या पदांसाठी आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली असून शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2020 आहे. याआधी अर्ज करण्याची शेवटची तरीख 3 नोव्हेंबर होती. पण कोरनो संसर्ग लक्षात घेता, ही मुदत 10 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली.
पोस्ट खात्यात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पोस्टमन आणि मेल गार्ड या पदासाठी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेकडून 12 वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेय अर्जदाराला मराठी भाषा अवगत असणे बंधनकारक आहे.
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदासाठी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेकडून 10 वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. तसेच मराठी भाषेचे ज्ञान असणेही बंधनकारक आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होईल. पोस्टमन आणि मेलगार्ड या पदासाठी 21,700 रुपये ते 69,100 रुपयांपर्यंत पगार असेल. मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)पदासाठी 18,000 रुपये ते 56,900 रुपयांपर्यंत पगार असेल.पोस्टमन, मेलगार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी अर्जदाराचे वय 18 ते 27 वर्षांपर्यंत असावे. अर्ज करण्यासाठी तसेच परीक्षा देण्यासाठी UR/OBC/EWS प्रवतर्गातील उमेदवारांना 500 रुपये फी असेल. तसेच SC/ST/PWD आणि महिला अर्जदाराला 100 रुपये फी असेल.
* कोणत्या पदासाठी, किती जागा ?
पोस्टमन- 1 हजार 29 जागा
मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)- 327 जागा
मेलगार्ड- 15 जागा