पंढरपूर / सोलापूर : सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंढरीत हाहाकार उडाला आहे. चंद्रभागा नदी तीरावर नव्याने बांधण्यात आलेल्या कुंभार घाटाची भिंत दुपारी अडीच वाजता कोसळली. या घटनेत 6 जणांचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
पावसामुळे या भिंतीच्या आडोशाला काही लोक उभे होते. यामुळे मोठ्या संख्येने लोक या दगडाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. खास करून काठावर भीक मागणारे भिकारी या भिंतीच्या आडोशाला होते. मृत पावलेले हे कोळी समाजाचे नावाडी होते. तसेच यात काही वारकरी आहेत. गोपाळ अंभगराव, मंगेश अभंगराव, राधा अभंगराव असे आणि काही वारकरी असल्याचे वृत्त आहे. तसेच या घाटाचे काम निकृष्टपणाचे झाले आहे. या घाटाचे काम होऊन वर्षच झाले असल्याचे सांगितले तेथील उपस्थित लोकांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भिंत कोसळल्याने त्याचा मोठा आक्रोश सुरू झाला होता. नक्की ढिगाऱ्याखाली किती लोक दाबले गेले याची चिंता असून मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांच्यासह नगरपालिका प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असूध मदतकार्य सुरु आहे. जेसीबी व रुग्णवाहिकेसह घटनास्थळी रवाना झाले आहेत शहराच्या विविध भागातून उपनगरातून आजच्या पावसाने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे.
शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाने पंढरपूर तालुक्याला झोडपले आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली पावसामुळं सर्वाधिक नुकसान पंढरपूर तालुक्यात झाले असून टाकळी, कासेगाव भागात डाळिंब आणि द्राक्षबागांचं कोट्यावधींचे नुकसान झाल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.
* अक्कलकोटमध्ये राजवाड्याचा बुरुज ढासळला
सोलापूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीपासून पावासाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील राजवाड्याचा बुरूज ढासळला. वैराग-जवळगाव रस्ता पाण्याखाली गेला होता.