लातूर : लातूर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसाचा फटका एका मृतदेहालाही बसलाय. निलंगा तालुक्यातील हनुमंतवाडी येथील रावण रंगराव सूर्यवंशी हा ७६ वर्षीय इसमाचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला होता. मात्र मंगळवारी काल सायंकाळपासून निलंगा तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यात गावात स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध नसल्यामुळे मृतदेहावरील अंत्यसंस्कार रखडले आहेत.
त्यात आज बुधवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे अंत्यविधी करावा तरी कसा प्रश्न नातेवाईक आणि ग्रामस्थांना पडला होता. लातूर जिल्ह्यात यावर्षी ११३ टक्के इतका पाऊस झालाय. तर कालपासून निलंगा तालुक्यात ११० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान याविषयी अद्याप ग्रामस्थांनी कसल्याही प्रकारची तक्रार केलेली नसल्यामुळे अद्याप हा विषय आपणास माहीत नसून याविषयी गटविकास अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना करण्याचे निर्देश तहसीलदार गणेश जाधव यांनी सांगितलं आहे. माहिती कळल्यानंतर सूत्रे हलल्यानंतर सायंकाळच्या सुमारास मृतदेहावर अंत्यविधी उरकले. सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार झाल्याचे गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी सांगितलं.