उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूरची वरदायिनी म्हणून सीना नदीला ओळखले जाते. सतत पडणाऱ्या पाऊस व उजनीतून सोडण्यात आलेले पाणी आज गावात शिरले. हे पाणी शिवणी, तिऱ्हे, पाथरी, तेलंगाव, नंदुर आले आहे.
पाकणी गावातील नदी काठच्या घरांना याचा फटका बसला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने कोणत्याही प्रकाराची उपाययोजना केली गेली नाही. तिऱ्हे येथील पुलावरून फूट ते दीड फूट पाणी वाहत आहे. पाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात घुसले असून आवश्यक असणारे साहित्य इतरत्र हलविण्यात येत आहे. तिऱ्हे परिसरातील काही घरे पाण्यात असून त्यांना मदतीची आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.
तालुका पोलीस व प्रशासन बघ्याची भूमिका घेत असून यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शिवणी गावचा संपर्क तुटला असून गाव पूर्णपणे पाण्याने वेढले आहे. पाणी गावातील शाळा,मंदिर व सखल भागात आले आहे. पाथरी गावात शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. डोणगाव येथील ओढ्याचे पाणी गावात आले असून गावातील व शेतातील लोकांशी संपर्क तुटला असून गावातील तरुण युवक एकमेकांच्या मदतीला धावून आली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेलंगाव येथील नदी काठची शेती पाण्यात गेली असून उसामध्ये पाणी साचले आहे. नंदुरमध्ये ग्रामपंचायत व शाळेजवळ पाणी आले असून दक्षिण सोलापूर ये-जा करणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्ष व तालुका प्रशासनाने लवकरात लवकर नियोजन करावे, अशी मागणी गावक-यामधून होत आहे.