श्रीपूर : गेल्या दिवसापासून श्रीपूर बोरगाव, माळखांबी, महाळुंग परिसरात सतत मुसळधार पाऊस पडल्याने महाळुंग विभागात एका दिवसात १६० मिलीमिटर पाऊसाची नोंद झाली आहे. या परिसरातील ओढ्यांना काल सायंकाळी ५ च्या सुमारास माळखांबी, बोरगाव, महाळुंग या ओढ्यांना पूर आला आहे. सतत पडणार्या पावसामुळे शेतकरीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.
बोरगाव येथे ओढ्याला मोठ्या प्रमाणात आलेल्या वेगवान पाण्यामुळे बोरगाव — वेळापूर रोडवरील स्मशानभूमीलगत असणार्या ओढ्याच्या पाञाच्या बाहेर पाणी येऊन पुलावरचा भरावा वाहुन पुलाला मोठे भगदाड पडले आहे. या पुलावरुन होणारी वाहतूक बंद पडली आहे, तसेच ओढ्यालगत असणार्या दोन्ही स्मशानभूमी भिंत कोसळुन मोठे नुकसान झाले आहे.
ओढ्या लगत राहत असलेल्या ग्रामस्थांच्या १० ते १५ घरामध्ये ओढ्याचे पाणी शिरल्याने यांना ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षीत ठिकाणी हलवण्यात आले. महाळुंग येथे ओढ्याला आलेल्या पुरामुळे महाळुंग व्हरगरवस्ती येथील ५ घरे पाण्याखाली गेली आहेत. पाणी वाढत असल्याचे लक्षात येताच घरामधील सर्व साहित्य बाहेर काढून सुरक्षीत ठिकाणी नेण्यात आले. महाळुंग गावठाण मधील ५० ते ६० लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले असल्याचे महाळुंग तलाटी एस ए भोसले यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भीमा नदीला आलेल्या पुरामुळे खळवे, जांबुड गावाला पुराचा वेढा पडला आहे. उजनी धरणातून २ लाख २० हजाराचा विसर्ग सोडल्याने भीमा नदीला पूर आला आहे. माळशिरस तालुक्यातील उंबरे वेळापुर, कोंडारपट्टा,नेवरे, जांबुड, खळवे या गावातील लोकांना अलर्ट करण्यात आले आहे . भिमा नदिला पुर आल्याने नेवरे— करकंब पुल , जांबुड — आव्हे बंधार्यावरील रस्ता, करोळे— मिरे बंधार्यावरील रस्ता, उंबरेवेळापुर — उंबरे पागे पुल आदी ठिकाणची वाहतूक ठप्प झाली आहे.
जांबुड गावठाणालगत कचरे या शेतकर्याच्या बांधलेल्या जागी दोन मशी आणि ५ शेळ्या बुडून गेल्या. तसेच जांबुडगावाला पाण्याचा वेढा आल्याने जांबुड — नेवरे व जांबुड — बोरगाव, जांबुड — खळवे मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. जांबुड गावठानात ४ घरांची पडझड झाली असुन ९ कुटुंबांना जि.प.शाळा सुरक्षित ठिकाणी स्थांलतरीत करण्यात आले आहे.