उत्तर सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये सीना नदी परिसरातील गावात पाणी शिरल्याने नेशनल डिफेन्स एन्ड रेस्क्यू दलास पाचारण केले होते. या १६ दल व ४ बोटीच्या मदतीने प्रांताधिकारी,तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक,स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन, पदाधिकारी व युवकांच्या सहकार्याने १८१ लोकांना सुरक्षितस्थळी हलवले.
शिवणी – ६२ , तिऱ्हे-८३, पाथरी-१५, तेलगाव-१४, नंदूर-७ असे १८१ लोकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी पोहोच करण्यात आले. पाकणी, डोणगाव व नंदूर येथे प्रशासकीय अधिका-यांनी भेट दिली. पाच गावातील जवळपास ५०० ते ६०० कुटुंबाना महापुराचा फटका बसला आहे. पुरातील पाण्यामध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू घरा-घरात शिरल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुन्हा एकदा सुरक्षा अधिकारी प्रत्येक गावला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत असून शासनांनी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. बाधितांचे आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने, जि. प. विरोधी पक्ष नेते बळीरामकाका साठे, सभापती रजनी भडकुंबे, जि.प. सदस्या उषा सुरवसे, पंचायत समिती सदस्य हरी शिंदे, गटविकास अधिकारी जश्मीन शेख, तहसीलदार जयवंत पाटील यांनी भेट देऊन तात्काळ मदत करण्यात येईल, असे सांगितले आहे.