अबुधाबी : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आणखी एक सुपर ओव्हर पाहायला मिळाली आहे. हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाताचा सनसनाटी विजय झाला आहे. सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी गरजेच्या असलेल्या 3 रनचा पाठलाग कोलकात्याने अगदी आरामात केला. त्याआधी आपली पहिलीच मॅच खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसनने फक्त 2 रन देऊन 2 विकेट घेत हैदराबादची सुपर ओव्हर संपवली.
कोलकात्याने ठेवलेल्या 164 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात चांगली झाली होती. जॉनी बेयरस्टो आणि केन विलियमसन यांच्या जोडीने हैदराबादला 6 ओव्हरमध्ये 57 रनची ओपनिंग पार्टनरशीप करुन दिली. पण नंतर मात्र हैदराबादला वारंवार धक्के लागत होते. कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने 33 बॉलमध्ये नाबाद 47 रन आणि अब्दुल समदने 15 बॉलमध्ये 23 रन करुन हैदराबादचा स्कोअर टाय केला. कोलकात्याकडून लॉकी फर्ग्युसनने 4 ओव्हरमध्ये 15 रन घेऊन 3 विकेट घेतल्या. फर्ग्युसनची यंदाच्या मोसमातली ही पहिलीच मॅच आहे. तर कमिन्स, मावी आणि चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध
या मॅचमध्ये हैदराबादने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर कोलकात्याकडून कोणत्याही बॅट्समनला सुरुवात मिळाल्यानंतरही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शुभमन गिलने सर्वाधिक 36 रन केले. तर मॉर्गनने 34, नितीश राणाने 29, कार्तिकने नाबाद 29 आणि त्रिपाठीने 23 रन केले. हैदराबादकडून नटराजनने 2, तर बसिल थंपी, विजय शंकर आणि राशिद खानला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
या विजयासोबतच कोलकात्याचे आता 10 पॉईंट्स झाले आहेत. कोलकात्याने 9 पैकी 5 मॅचमध्ये विजय मिळवला, तर 4 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला. पॉईंट्स टेबलमध्ये कोलकात्याची टीम चौथ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबादने 9 पैकी 3 मॅच जिंकल्या असून 6 मॅचमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची टीम पाचव्या क्रमांकावर आहे.