नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात पैसे मिळवण्याची संधी शोधत असाल तर तुम्हाला घरबसल्या 25 हजार रुपये मिळवण्याची संधी आहे. मुख्य म्हणजे काहीही न करता तुम्हाला हे 25 हजार रुपये मिळणार आहेत. यासाठी फक्त तुमच्याकडे 10 रुपयांची नोट असणं गरजेचं आहेत. मात्र ही 10 रुपयांची नोट साधीसुधी नाही आहे.
आजकाल सर्वत्र नवीन नोटा दिसतात. जुन्या नोटा बाजारातून गायब होत आहेत. अशा परिस्थितीत तुमच्याकडे जुनी 10 रुपयांची नोट असेल तर तुम्ही त्यातून पैसे कमवू शकता. मात्र ही 10 रुपयांची नोट खूप वर्षांपूर्वी भारतीय चलनात होती.
ब्रिटीश भारतात अशा बर्याच नोटा चालत होत्या, ज्याची कोणालाही कदाचित माहिती नसेल. अशोक स्तंभ पहिल्या दहा रुपयांच्या नोटांवर असे. 3 चेहरे असलेल्या सिंहाच्या चेहऱ्याची ही नोट दुर्मिळ आहे, मात्र तुमच्याकडे ही नोट असेल तर तुम्ही श्रीमंत होऊ शकतो. या 1 नोटसाठी 20-25 हजार रुपये मिळू शकतात. चांगली गोष्ट म्हणजे आपण ही नोट घरून विकू शकता.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध
ही नोट तुम्ही घरून इंडियामार्ट, शॉपक्लूज आणि मरुधर आर्ट्सवर चांगल्या किंमतीला विकू शकता. या प्लॅटफॉर्मवर देखील, आपल्याला या नोटसाठी चांगली किंमत मिळेल. आपण या नोट्स या कंपनीच्या साइटला भेट देऊन विकू शकता. त्या बदल्यात तुम्हाला 25 हजार रुपये मिळतील.
* या नोटचा इतिहास
ही नोट 1943 मध्ये ब्रिटीश राजांनी जारी केली होती. या नोटवर भारतीय सीडी देशमुख यांनी सही केली आहे. दहा रुपयांच्या या जुन्या नोटात एका बाजूला अशोक स्तंभ आणि दुसर्या बाजूला एक जहाज आहे. तर, या नोटच्या मागील बाजूस दोन्ही बाजूंनी इंग्रजीत 10 रुपये लिहिलेले आहेत.