उस्मानाबाद / तुळजापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या झालेल्या नुकसानीची उस्मानाबदमधील भागाची आज पाहणी केली. तुळजापूरमधील भागाची पाहणी केल्यानंतर येत्या 10 दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. महाराष्ट्राला केंद्राने मदत करावी, अशी मागणी करणार असल्याचे पवार म्हणाले.
आज रविवारी त्यांनी शेतकऱ्यांशी मुक्तपणे संवाद देखील साधला आहे. शरद पवार यांनी तुळजापूरमधून आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. त्यांनी काकांब्रा, लोहारा, सास्तुर, उमरगा या गावांचा दौरा केला. दरम्यान पवार यांनी आपल्या कांकाब्रा ते सास्तुर दौऱ्या दरम्यान तीनवेळा रस्त्यात गाडी थांबवून पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. शरद पवार यांनी आपल्या भेटी दरम्यान अनेक ठिकाणी गाडी थांबवली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पीकं पावसात वाहून गेली. दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी आज पहिल्या दिवशी उस्मानाबाद मधील लोहारा तालुक्यातील सास्तुर गावामधील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या
यावेळी पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता येणार नाही, केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा आणि भरीव मदत करावी. राज्य सरकारला मदत करण्यासाठी मर्यादा आहेत, असं ही पवार म्हणाले. तसेच या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. या संकटाने खचून न जाता याचा धीराने सामना करावा लागेल, खासदारांचं शिष्टमंडळ घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत, महाराष्ट्राला केंद्रानं मदत करावी, अशी मागणी करणार आहेत, असेही शरद पवार म्हणाले.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध
* खचून जावू नका पवारांनी केले शेतकऱ्यांचे सांत्वन
पवार यांनी उस्मानाबादच्या दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पवारांनी शेतकऱ्यांना खचून जावू नका असं म्हटलं आहे. दरम्यान किल्लारी भूकंपावेळी खचला नाहीत आताही खचू नका अस म्हटलं आहे. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, हा फक्त सास्तुरचा प्रश्न नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे.
हे संकट संपूर्ण शेती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारं आहे. या संकटावर, आलेल्या अडचणींवर एकजुटीने मात करू. सध्या दिवस वाईट आहेत, अडचणीचे आहेत परंतु धीर सोडायचा नाही. यावर मात करू. सरकार तुमचं आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकर्यांना धीर दिला. धीर सोडू नका, आम्ही आहोत,’ असा शब्द पवारांनी या शेतकऱ्यांना दिला. लातूर जिल्ह्याती किल्लारी आणि परिसरात झालेल्या भूकंपाची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. त्या ठिकाणी पहाटे पोहोचून लोकांना धीर दिला होता.