पाटणा : ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे पुत्र लव यांना काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. पुढची पिढी राजकारणात सक्रिय झाल्याने शत्रुघ्न राजकीय संन्यास घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, तसा विचार नसल्याचे सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीआधी शत्रुघ्न यांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्या मुलाला काँग्रेसने निवडणूक रिंगणात उतरवले आहे.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…
स्वत: शत्रुघ्न मागील काही काळापासून फारसे सक्रिय असल्याचे दिसत नाहीत. त्यामुळे ते राजकारणातून निवृत्त होण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
मी थकलेलो नाही आणि निवृत्तही झालेलो नाही. मी राजकारणात सक्रिय राहणार आहे, असे 74 वर्षीय शत्रुघ्न म्हणाले. बिहारी बाबू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शत्रुघ्न यांनी लव बिहारी पुत्र या नात्याने निवडणूक लढवत असल्याचेही नमूद केले. ते सांगताना त्यांनी लव वरून लादलेले उमेदवार असल्याचा आरोप फेटाळून लावला. काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये समावेश झालेले शत्रुघ्न लवकरच मुलाच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.