उस्मानाबाद : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. याच पार्श्वभूमीवर पवारांनी उस्मानाबादच्या दौरा आखला आहे. मात्र पवारांच्या या दौऱ्यात चोरांचा सुळसुळाट पाहायला मिळाला.
उमरगा लोहारा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीला गेली. अज्ञात चोरट्याने ही सोनसाखळी लंपास केली आहे.
‘सुराज्य डिजिटल’ आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, तर मग चॅनल जॉईन करा…फेसबुक पेज, टेलिग्राम, ट्वीटर आणि शेअरचॅटवरही उपलब्ध
दरम्यान आमदारांचीच सोनसाखळी लंपास झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. जवळपास २ लाख रुपयांची सोनसाखळी होती.
शरद पवार यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात तुळजापूरमधून केली होती.
शरद पवार यांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत लोकप्रतिनिधी आणि अधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान त्यांच्या सोबत उमरगा- लोहारा तालुक्याचे शिवसेनेचे आमदार ज्ञानराज चौगुले देखील सोबत होते. चौगुले यांच्या गळ्यात ४ तोळे वजनाची सोनसाखळी होती. या सोनसाखळीची किंमत जवळपास २ लाख रुपये इतकी आहे. चोरांनी गर्दीचा फायदा घेत आमदारांच्याचं सोनसाखळीवर डल्ला मारला आहे.
दरम्यान घडलेल्या सदर प्रकारामुळे यंत्रणेची चांगलीच धापवळ उडाली होती. सोनसाखळी चोरीला गेल्यानंतर आमदार चौगुले यांनी याप्रकरणी अद्याप पोलिसांत कोणतीही तक्रार दिलेली नाही. मात्र आमदारांचीच सोनसाखळी चोरीला गेल्यानंतर पोलीस मात्र चांगलेच सतर्क झाले.