नाशिक : त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची येथील एका युवकाने सुरीने गळा चिरून हत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येच्या घटनेने त्र्यंबकेश्वरसह नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मोठे बंधू शेखर यांच्या बाराव्याचे श्राद्ध विधी सुरू असताना धनंजय तुंगार यांना फोन आला. त्यामुळे ते अहिल्या धरणाकडे गेले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेथे आधीच दबा धरून बसलेल्या गोणदके नावाच्या तरुणाने त्यांच्या गळ्यावर सुरीने वार करून हत्या केली. धनंजय हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेनंतर आरोपी हा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला.
या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला काँग्रेसमध्ये असलेल्या तुंगार यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. सध्या ते राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांनी दोनदा त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्षपद भूषवले होते.