मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप कार्यालयात झालेल्या खडसेंच्या राजीनाम्या बाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर ज्यांच्यावर सर्वस्वी आरोप केले असे देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले, एकनाथ खडसेंना आम्ही आमच्या पक्षात ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु आमचे प्रयत्न निष्फळ ठरले. त्यांनी ज्या पक्षात जावे तेथे जनतेचे प्रश्न मांडावे, ही प्रतिक्रिया पाटलांनी दिली.
ते म्हणाले खडसे यांच्या राजानामा माझ्याकडे आला आहे. त्यांनी आमच्या पक्षात राहवे, अशीच आमची भूमिका होती. तसे आम्ही प्रयत्न देखील केले पंरतु आम्ही अयशस्वी ठरलो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आज सकाळीच आमचे भ्रमणध्वनी वरुन एकमेकाला संपर्क केला होता. पंरतु आमचे प्रयत्न निष्फळ ठरले. कितीही राग आला तरी पक्ष सोडतील असे वाटले नव्हते. असो, ज्या पक्षात गेले आहे त्यांनी तेथे चांगले काम करावे व तसेच त्यांच्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा.
असे खडसे म्हणाले. या प्रतिक्रियेवर देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे त्याबाबत मी काही बोलणार नाही, असेही पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
* देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
खडसेंना थांबवण्याचा प्रयत्न करणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आमच्या अध्यक्षांनी आधीच प्रयत्न केले आहेत. ते याविषयी अधिक सांगू शकतील”. देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीचा फटका बसलेल्या जिल्ह्यांचा दौरा करत असून परिस्थितीची पाहणी करत आहेत. यावेळी ते बोलत होते. तसेच त्यांच्या कोणत्याच आरोपवर आपण प्रतिक्रिया देणार नाही. वेळ आली की मी सविस्तर बोलेन, कोणावर तरी आरोप करायचा होता, तो माझ्यावर झाला आहे. त्यांनी जे काही तक्रारी होत्या त्या वरिष्ठाकडे मांडाव्यास हवे होत्या, असे सांगत फडणवीसांनी जादा बोलणे टाळले.