सोलापूर : दसरा सणासाठी सोलापुरात झेंडू फुलांची आवक झाली आहे. झेंडूची आवक असल्यामुळे किरकोळ बाजारात प्रतिकिलो शंभर ते दीडशे रूपयांचा भाव झेंडूला आला आहे. त्यातच अलीकडेच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झेंडू फूल शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांची आवक खूपच घटली आहे. आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे झेंडूचा दर दसरा सणाच्या पूर्वसंध्येला दीडशे रुपये किलो पर्यंत पोहचला आहे.
सोलापुरातल्या मारुती मंदिर परिसरात फुलांचा बाजार भरतो. शहरात यंदा सुमारे ४० हजार किलो फुलांची आवक झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, करमाळा, उत्तर सोलापूर आदी भागासह पुणे, नगर व इतर जिल्ह्यांतून झेंडू फुलांची आवक झाल्याचे फुल व्यापाऱ्यांनी सांगितले.
झेंडू फुलांप्रमाणेच केळीच्या खुंटांना दसरा सणात धार्मिक पूजा विधीसाठी मान असतो. अतिवृष्टीने केळीच्या बागांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. परिणामी, बाजारात विक्रीसाठी केळीचे खुंट कमी प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. केळीचे खुंटीचे एक संच ६० रूपयांस खरेदी केले जात होते.
यंदा कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सगळेच सण-उत्सव साध्या पध्दतीने साजरे होत आहेत.