मुंबई : मुंबई वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून त्याच्यावर हात उचलणाऱ्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ऐन नवरात्र उत्सवात हा व्हिडीओ समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
ही महिला पोलिसाची कॉलर पकडून त्याला बेदम मारहाण करत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रकरणी स्थानिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेत व्हिडीओ व्हायरल केला.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मुंबईतील काळबादेवी परिसरात घडली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वाहतुकीचे नियम मोडल्याने या हवालदाराने अडवले आणि त्यांना विचारणा केली. महिलेनं आणि तिच्यासोबत असलेल्या व्यक्तीनं उडवा-उडवीची उत्तर देत गोंधळ केला. वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
वाहतूक पोलिसाने या महिलेला शिवीगाळ केल्याचा आरोप मारहाण करणाऱ्या महिलेनं केला आहे. त्यामुळे संतापाच्या भरात या महिलेनं वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केली. दरम्यान तिथे असलेल्या पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी हस्तक्षेप केला आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं आहे.
* महिलेला घेतले ताब्यात
मोहसीन निजामउददीन खान या महिलेला पोलिसांनी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या महिलाला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान काळबादेवी परिसरात 24 तास पोलीस असतानाही असा प्रकार खरंच घडला असेल तर तक्रार करण्याऐवजी दादागिरी दाखवून वाहतूक पोलिसांवर हात उचलण्यापेक्षा पोलिसात तक्रार करणं अपेक्षित होतं. मात्र महिलेनं वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण केल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.