पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार सोमवारी समाप्त झाला. आता पहिल्या टप्प्यातील विधानसभेच्या 71 जागांसाठी उद्या बुधवारी मतदान होईल. बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत.
पहिल्या टप्प्यात निवडणूक रिंगणात असलेल्या बिहारच्या अर्धा डझन मंत्र्यांचे भवितव्य पणाला लागणार आहे. बिहार निवडणुकीसाठी तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांसाठी 3 आणि 7 नोव्हेंबरला मतदान होईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पहिल्या टप्प्यात एकूण 1 हजार 66 उमेदवार त्यांचे नशीब आजमावत आहेत. त्यामध्ये 114 महिलांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात मतदानाला सामोऱ्या जाणाऱ्या जागा सहा जिल्ह्यांमधील आहेत.
विरोधकांच्या महाआघाडीचे नेतृत्व करणारा राजद पहिल्या टप्प्यात सर्वांधिक 42 जागा लढवत आहे. त्या महाआघाडीतील आणखी एक महत्वाचा घटक असणारा काँग्रेस पक्ष 21 जागा लढवत आहे. सत्तारूढ एनडीएतील जेडीयूने 41 तर भाजपने 29 जागांवर उमेदवार दिले आहेत. स्वतंत्रपणे लढणाऱ्या लोजपने 41 जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.