सोलापूर : मंगळवेढा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आमदार भारत भालके यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. उपचारासाठी आमदार भारत भालके मुंबईला रवाना होत आहेत.
काही दिवसांपूर्वीच आमदार भालके यांचे पुत्र आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगीरथ भालके हे सुद्धा पॉझिटिव्ह आले होते. तसेच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मॅनेजर कार्यालयीन सचिव यांच्यासह जवळपास २० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या काही दिवसात कारखाना सुरू करण्यासाठी भालके पिता-पुत्र सतत कारखान्याचे अधिकारी कर्मचारी यांच्या संपर्कात होते. तसेच कामानिमित्त सतत मुंबई – पुणे सोलापूर असे दौरे होत असताना आमदार भालके यांचा संपर्क कोरोना बाधित व्यक्तीशी आला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
आजच आमदार भारत भालके यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना सध्या सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. मात्र खबरदारी म्हणून त्यांना मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.