गडचिरोली : पोलिसांच्या सतर्कतेमुळे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या 141 गाई, बैलांचे प्राण वाचले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील जनावरे पाच कंटेनरमध्ये कोंबून हैदराबाद येथे कत्तलीसाठी नेण्यात येत होते. गाई, बैल, म्हशींना वाचविण्यात पोलिसांना यश आले, तर अनेक जनावरे वाहनात गुदमरून मरण पावली. पोलिसांनी पाचही वाहने जप्त करून 11 आरोपींना अटक केली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्या 11 जणांना अटक केली असून 141 जनावरांची सुटका केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून जवळपास 1 कोटी 15 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 28 फेब्रुवारी रोजी आरमोरी ते ठाणेगाव मार्गावर करण्यात आली. अटक करण्यात आलेले गोवंश तस्कर हे नागपूर, यवतमाळ, तेलंगणा, मध्यप्रदेश राज्यातील आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुन्हे शाखेने पाच वाहनांतून 141 गाई, म्हशी आणि रेडे किंमत 17 लाख 55 हजार रुपये, 97 लाख किंमतीची 5 वाहने आणि 1 लाख 13 हजारांचे 10 मोबाईल असा एकंदरीत 1 कोटी 15 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, सहायक पोलिस निरीक्षक विक्रांत सगणे यांच्या पथकाने केली.
* अकरा अटक आरोपी
अटक करण्यात आलेल्या आरापींमध्ये शाहबाज हमीद खान (वय 23 रा.झू पार्क, बहादूरपुरा, हैदराबाद, अब्दुल अजीज अबदुलरहू (वय 28), रा. गडचांदुर ता. राजुरा, जि. चंद्रपूर, करीम खान नबी खान (वय 37) रा. कलगाव, ता. दिग्रस जि. यवतमाळ, आसीफ मोहसीन कुरेशी (वय 27) रा. पिली नदी, नागपूर, मिर्झा मुजाहीद मुबारक बेग (वय 24) रा. मंडल जेन्नूर, जि. आसिफाबाद, तेलंगणा, ह. मु. लक्कडकोट, ता. राजुरा, जि. चंद्रपूर, मिर्झा गफ्फार अनवर बेग (वय 34) रा. उतनुर, जि. आदिलाबाद, तेलंगणा, शेख अस्लम शेख नवाज (वय 19) रा. किरामिरी, जि. आसिफाबाद, तेलंगणा, शेख अस्लम शेख नवाज (वय 19) रा. किरामिरी जि. आसिफाबाद तेलंगणा, लतीफ खान बाबू खान (वय 32) रा. इलियासनगर, जि. आदिलाबाद, तेलंगणा, राजू मदन पाल (वय 45) रा. यशोधरानगर, हनुमान मंदिराजवळ, नागपूर, राजेश हृदयसिंग मडाम (वय 25) रा. नेवसा, ता. बिछिया, जि. मंडला, मध्य प्रदेश, कमलेश उर्फ पिंटू नत्थुलाल गुप्ता (वय 38) रा. नागपूर यांचा समावेश आहे.