मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढणार नाही. आमचं ममतांना समर्थन असेल, अशी माहिती संजय राऊत यांनी ट्विट करून दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. ‘आम्हाला आशा आहे की, ममता दीदींची डरकाळी पुन्हा एकदा यशस्वी होईल. कारण त्या खऱ्या बंगाली टायगर आहेत’, असं ते म्हणाले.
ममता बॅनर्जी खऱ्या बंगालच्या वाघीण आहेत, त्यामुळे पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक न लढता त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय होवो अशी आमची इच्छा आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. ममता बॅनर्जी खऱ्या बंगालच्या वाघीण आहेत, त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये निवडणूक न लढता त्यांना पाठिंबा देण्याचं शिवसेनेने ठरवलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 26 फेब्रुवारी पत्रकार परिषद घेऊन पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमधील निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. परंतु पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीकडे नजरा लागल्या आहेत.
* ममताच खऱ्या बंगालच्या वाघीण
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवण्याविषयी संजय राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “शिवसेना पश्चिम बंगाल निवडणूक लढवणार की नाही याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. पक्षाचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा केली. सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सर्व असा सामना रंगलेला दिसत आहे. सर्व एम – मनी, मसल अॅण्ड मीडिया (पैसा, ताकद आणि मीडिया) चा वापर ममता दीदींविरोधात वापरलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचं ठरवलं आहे आणि त्यांना पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. ममता बॅनर्जी यांचा मोठा विजय होवो, कारण आम्हाला वाटतं की त्याच खऱ्या बंगालच्या वाघीण आहेत.