मुंबई : वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशात इंधन दरवाढ आणि सक्तीच्या वीज देयक वसुलीने हैराण सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. १ एप्रिलपासून वीज दर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय एमईआरसीने घेतला आहे.
एमईआरसीने एफएसी फंडच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडचा वापर करुन ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले. दरम्यान, मार्च २०२० मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्याची सुरुवात झाली, असं एमईआरसीने सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यातील वीजग्राहकांना दिलासा देणारे निर्देश देत वीज नियामक आयोगाने १ एप्रिलपासून वीजदर सुमारे २ टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियामक आयोगाने सुनावणी दरम्यान एफएसी (इंधन समायोजन उपकर) फंडाच्या माध्यमातून वीज कंपन्यांना फंडाचा वापर करून ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश दिले आहेत.
मार्च २०२० मध्ये या एफएसीच्या माध्यमातून जनतेला दिलासा देण्यास सुरुवात झाली. मार्च २० ते मार्च २१ पर्यंत सर्व रहिवासी, दुकान, कंपनी, उद्योगासाठी १० टक्के वीजदर कमी करण्यात आले. या वर्षी १ एप्रिलपासून ते या संपूर्ण वर्षासाठी टाटा, अदानी, बेस्ट आणि महावितरण यांना वीज दर कमी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.