मुंबई : सुशांत प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो आज कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे. यात अभिनेत्री रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी आहे. तिचा भाऊ शौविक आणि 32 जण आरोपी आहेत. ही चार्जशीट इलेक्ट्रॉनिक वस्तूंसारखे मोबाइल फोन आणि कॉम्प्युटरच्या फॉरेन्सिक टेस्ट करुन आणि साक्षीदारांच्या जबाबावरुन तयार करण्यात आली आहे. मिडिया रिपोर्टनुसार 12 हजार पानांची ही चार्जशीट आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पहिल्यांदाच नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने शुक्रवारी विशेष एनडीपीएस न्यायालयात या प्रकरणी संबंधित ड्रग्स प्रकरणात आरोप पत्र दाखल केले आहेत. सुशांत प्रकरणात मुख्य आरोपी असलेली सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्तीसह इतर 33 जणांचाही आरोप पत्रात उल्लेख केला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एनसीबीने 12 हजार पानांचे चार्जशीट तयार करण्यात आले आहे. जे आज दाखल करण्यात आले आहे. एनसीबीच्या चौकशीत रियाने सांगितलं की, सुशांत 2016 मध्ये ड्रग्स घेत असे आणि तिच सुशांत करता ड्रग्स मागवत असे. तसेच तिने हे देखील कबुल केलं आहे की, कधी कधी पार्टीत ती देखील ड्रग्सचं सेवन करत असे. या प्रकरणात रियाला एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. एक महिना रियाला कारागृहात ठेवण्यात आले असून आता तिच्यासह 33 जणांवर चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.
चार्जशीटमध्ये दीपिका पदुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे जबाब सुद्धा जोडले आहेत. पाच आरोपी फरार सांगण्यात आले आहेत, तर रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती मुख्य आरोपी आहेत. याशिवाय रियाचे निकटवर्तीय आणि अनेक ड्रग्ज पॅडलर सप्लायरचे नाव सुद्धा चार्जशीटमध्ये आरोपी म्हणून सहभागी आहे. ड्रग्ज जप्ती, जप्त इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा रिपोर्ट, फॉरेन्सिक रिपोर्ट, साक्षीदारांचे जबाब या आधारावर हे चार्जशीट तयार करण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एनएसबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे चार्जशीट कोर्टात घेऊन आले. एनएसबी सूत्रांनुसार, या मुख्य चार्जशीटच्या तीन महिन्यानंतर एनसीबी एक सप्लीमेंट्री चार्जशीट सुद्धा कोर्टात दाखल करणार आहे. ज्यामध्ये सारा अली खान, श्रद्धा कपूरचे नाव असू शकते. त्यांच्याविरूद्ध सुद्धा एनएसबीला अनेक पुरावे मिळाले होते, ज्यांचा तपास अजूनही जारी आहे. हे चार्जशीट 16/2020 कम्पलेंट केस प्रकरणात दाखल होत आहे.
मागच्या वर्षी जूनमध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत, मुंबईतील बांद्रायेथील फ्लॅटमध्ये मृत आढळला होता. सुरुवातीला या प्रकरणाला केवळ आत्महत्याच मानले गेले. मात्र, सुशांतच्या कुटुंबियांच्या तक्रारीनंतर या प्रकरणात सीबीआय सुद्धा सहभागी झाली. इतकेच नव्हे, माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी विशेष तपासासाठी बिहार पोलिसांची एक टीम मुंबईत पाठवली होती.
या प्रकरणात ड्रग्जचा अँगल आल्यानंतर अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींपर्यंत एनसीबी पोहचली होती. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीसह अनेक लोकांना जेल झाली. या प्रकरणात ज्या ड्रग पॅडलर्सचे नाव आले होते, त्यांच्यापैकी अनेकजण अजूनही कारागृहात आहेत.