भंडारा : लाखनी येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी महिलेने आज पहाटे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. शितल अशोक फाळके (वय २८) असे या महिला अधिकार्यांचे नाव आहे. त्या मुळच्या सातारा येथील रहिवासी होत्या. त्या अविवाहित असून आपल्या आईसमवेत लाखनी येथील माणिक निखाडे यांच्या घरी भाड्याने रहात होत्या.
बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लाखनी येथे आज शनिवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास उघडकीस आली. त्यांनी भाड्याच्या घरातील बाथरूममध्ये ओढणीने गळफास लावून घेतला. त्या ३० जून २०१७ पासून लाखनी येथे कार्यरत होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्या अविवाहित असून आईसोबत येथील माणिक निखाडे यांच्या घरी भाड्याने राहत होत्या. शनिवारी पहाटे बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांच्या आईला दिसल्या. या घटनेची माहिती तात्काळ लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला. त्यावेळी सुसाईड नोट आढळून आली. त्यात त्यांनी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करत असून आई मला माफ कर असे लिहिलेले आहे.
* काही दिवसांपासून तणावात
शीतल फाळके काही दिवसांपासून तणावात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी त्या कार्यालयात रडत असल्याचे सांगण्यात आले. मृदू आणि प्रेमळ स्वभावाच्या शितल कर्मचाऱ्यांत प्रिय होत्या. त्यांच्या आत्महत्येने जिल्ह्याच्या शासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.
शितल फाळके या गेल्या काही दिवसांपासून तणावात असल्याचे त्यांच्याबरोबर काम करणार्या कर्मचार्यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी त्या कार्यालयात रडत असल्याचे काही जणांनी पाहिले होते. मात्र, त्यामागील कारण त्यांनी कोणाला सांगितले नव्हते. त्यानंतर आज सकाळी सर्वांना त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समजल्यावर कर्मचार्यांना धक्का बसला.