औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या आवाहनामुळे राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढला. असं म्हणत ॲड. रत्नाकर चौरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलिस ठाण्यात राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, राज ठाकरेंनी मी मास्क घालत नाही असं म्हटलं होतं. तसेच नाशिकच्या दौऱ्यात माजी महापौर अशोक मुर्तडक यांना मास्क काढायला लावलं होतं.
कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासन प्रशासन कोरोनाचे नियम पाळण्याविषयी जनजागृती करत आहे तसंच नागरिकांना कोरोना प्रतिबंधक नियम पाळण्यास सांगत आहे. अशा काळात एखादा जबाबदार नेता अशा प्रकारचं आवाहन करतो, तर लोक त्याला का फॉलो करणार नाहीत, असा प्रश्न यानिमित्ताने त्यांनी उपस्थित केला.
राज ठाकरे यांच्या मास्क न लावण्याच्या आव्हानामुळे राज्यात कोरोना संसर्ग वाढला असल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात राज ठाकरे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात क्रांतिचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ॲड. रत्नाकर चौरे यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठी भाषा दिनानिमित्ताने राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कात एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी मास्क लावणं टाळलं होतं. याशिवाय नाशिक येथे दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी माजी महापौराला मास्क लावण्यावरुन प्रतिक्रिया दिली होती. यामुळे राज ठाकरे यांचं मास्क प्रकरण बरंच चर्चेत आहे. माध्यमांसमोर राज ठाकरे यांनी मी मास्क घालणार नाही असे वक्तव्य केले होते.
5 मार्च रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी नाशिकमध्ये त्यांचं स्वागत करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या परिसरात एकच गर्दी केली होती. राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी फुलाचा पुष्पगुच्छ घेऊन माजी महापौर अशोक मुर्तडक समोर आले होते. अशोक मुर्तडक यांनी तोंडावर एकावर एक असे दोन मास्क लावले होते. राज ठाकरे यांनी त्यांच्या तोंडावर दोन मास्क पाहिले आणि ‘मास्कवर मास्क’ असं विचारताच मुर्तडक यांनी मास्क बाजूला केला.
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतो आहे. मास्क लावा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असं आवाहन सरकार करत आहे. मात्र राज ठाकरे यांनी कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून आतापर्यंत तोंडाला मास्क लावलेला दिसला नाही. साहजिकच राज ठाकरेंच्या तोंडाला मास्क नसलं की लोकांच्यामध्ये चर्चा रंगते.