नवी दिल्ली : ‘ज्योतिरादित्य सिंधिया काँग्रेसमध्ये राहून मुख्यमंत्री होऊ शकतात’, असे वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधींनी केले. यावरून सिंधिया यांनी राहुल गांधींना टोला लगावला. ‘मी काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींना माझी एवढी चिंता असती तर चांगलं झालं असतं, असं खोचक उत्तर सिंधिया यांनी दिलं. दरम्यान, मागील वर्षी मार्च महिन्यात सिंधिया यांनी आपल्या 22 समर्थकांसहीत काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे पुन्हा त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. राहुल गांधी यांनी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले मध्य प्रदेशमधील नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी राहुल यांनी ज्योतिरादित्य सिंधिया आज काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते, असं वक्तव्य केलं. यावर आता ज्योतिरादित्य शिंदे यांनीही राहुल यांना टोला लगावत उत्तर दिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ज्योतिरादित्य यांनी, राहुल गांधी यांनी आधी याबद्दल चिंता केली असती तर बरं झालं असतं, असं म्हटलं आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यावरुन मध्य प्रदेशमधील राजकारण सध्या चांगलच तापलं आहे. प्रत्येक पक्षाकडून यासंदर्भात भाष्य केलं जात असतानाच आता खुद्द ज्योतिरादित्य सिंधियांनीही याबद्दल मत व्यक्त केलं आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया आज काँग्रेसमध्ये असते तर मुख्यमंत्री झाले असते असं वक्तव्य करणाऱ्या राहुल यांना शिंदेंनी टोला लगावला आहे. “मी काँग्रेसमध्ये असताना राहुल गांधींना माझी एवढी चिंता असती तर चांगलं झालं असतं,” असं खोचक उत्तर ज्योतिरादित्य यांनी या वक्तव्यासंदर्भात बोलताना दिलं आहे.
* जोत्यिरादित्य मुख्यमंत्री होणार नाहीत, त्यांना काँग्रेसमध्ये परतावे लागेल
राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य सिंधियाबद्दल बोलताना, ते भाजपामध्ये जाऊन मागील बाकावरील विद्यार्थी झाल्याची टीका केली होती. राहुल गांधी युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. संघटनेचे महत्त्व पटवून देताना राहुल यांनी जोत्यिरादित्य शिंदेंचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, ‘मी शिंदेंना म्हणालो होतो, की आपण मेहनत करा एक दिवस नक्की मुख्यमंत्री व्हाल. मात्र, त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. आता ते भाजपमध्ये बॅकबेंचर आहेत. तसेच ते तिथे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांना परतावे लागेल,’ असे राहुल गांधी म्हणाले होते.