सोलापूर : अयोध्येत राम मंदिर उभारलं जात आहे. आता अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राची जगातील सर्वात उंच अशी भव्य मूर्ती साकारण्यात येणार असल्याची माहिती मूर्तीकार अनिल राम सुतार यांनी दिली. ते आज मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते.
याअगोदर सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्टॅच्यू ऑफ युनिटी पुतळा आणि संसदेतील महात्मा गांधींचा पुतळा बनवलेला आहे. त्याच बरोबर इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार बनवणार आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असणारा राम मंदिर जन्मभूमीचा वाद संपुष्टात आल्यानंतर आता अयोध्येत राम मंदिर उभारलं जात आहे. यासाठी देशभरातून निधी देखील जमा करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते याकरता निधी गोळा करण्याचे काम करत आहेत. दरम्यान अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राची जगातील सर्वात उंच अशी भव्य मूर्ती साकारण्यात येणार
राममंदिरावरून सुरू असणारा वाद न्यायालयाच्या निर्णयानंतर संपुष्टात आल्यानंतर आता राममंदिर निर्माणाचं काम उत्साहात सुरू आहे. राममंदिराची ब्लू प्रिंट तयार झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालीय. या राममंदिर प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा असणार आहे प्रभू रामचंद्राची मूर्ती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी साधारण साडेतीन ते चार वर्षे लागणार आहेत. मूर्तीच्या निर्मितीसाठी दोन ते तीन हजार कारागीर आणि कामगार काम करणार आहेत. यातील सर्व कारागीर हे भारतीय असणार आहेत आणि याचे पूर्ण काम भारतातच होणार आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या पुतळा मेड इन अँड मेक इन इंडिया असणार असल्याचं मूर्तिकार सुतार यांनी सांगितले.
या राममंदिर निर्माणासाठी देशभरात निधी गोळा करण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं करण्यात येतंय. नव्वदच्या दशकापासून भारतीय राजकारणात राममंदिराचा मुद्दा हा प्रमुख राजकीय मुद्दा राहिलाय. भारतीय राजकारण याच मुद्द्याभोवती फिरत आलीय. अनेक निवडणुका या मुद्द्यावरून लढल्या गेल्या आणि देशातील सत्तांतरालाही हाच मुद्दा कारणीभूत ठरला.
* अशी असेल अतिभव्यता
मराठमोळे मूर्तीकार अनिल राम सुतार हे प्रभु रामचंद्राची मूर्ती साकारणार आहेत. ही मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्ती असल्याचं त्यांनी सांगितलंय. या मूर्तीची उंची २५१ मीटर म्हणजेच ८२० फूट असणार आहे. ही मूर्ती कास्य धातूची असणार आहे. या मूर्तीसाठी तयार होत असलेला चबुतरा ५१ मीटर उंचीचा आहे, तर त्यावर २०० मीटर उंचीची रामाची मूर्ती उभी राहणार आहे. गेल्या वर्षी ५ ऑगस्ट २०२० ला राममंदिराचा पायाभरणी समारंभ पार पडल्यानंतर आता या मंदिराच्या निर्माणकार्यानं वेग घेतलाय.
“साधारण ५१ मीटर उंचीच्या इमारतीवर २०० मीटर उंचीचा प्रभू श्रीरामांचा पुतळा उभारला जाणार आहे. यामध्ये प्रभू श्रीराम राजाच्या वेशभूषा मध्ये रत्नजडित पोशाखात असणार आहेत. प्रभू श्रीरामाचा एक पाय दगडावर ठेवलेला,एका हातामध्ये धनुष्यबाण,दुसऱ्या हातामध्ये कमान,पाठीवरती बानांचा अडकवलेला संच, डोक्याच्या मागे दिव्य चक्र,गळ्यामध्ये हार तर डोक्यावरती छत्री असणार आहे”
अनिल सुतार – मूर्तिकार