भुवनेश्वर : ओडिशातील सिमलीपाल नॅशनल पार्क वणव्याच्या आगीत धुमसत चालला आहे. या राष्ट्रीय उद्यानात मागील 10 दिवसांपासून भयंकर आग लागलीय. अद्यापही ही आग नियंत्रणात आलेली नाही. सिमलीपालच्या जंगलात बंगाली वाघ, आशियन हत्ती आणि चौशिंगा अशा प्राण्याचा अधिवास आहे. या जंगलात 3000 प्रकारच्या वनस्पती आहेत. 2009 मध्ये युनेस्कोकडून या भागाला वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्पेयर रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यात आले होते.
भारतात ओडिसामध्ये गेल्या महिन्याभरापासून जंगलांमध्ये भीषण आग लागली आहे. या आगीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली भाजप खासदारांच्या एका प्रतिनिधीमंडळाने केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली.
केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर खासदारांनी सांगितलं की, ओडिशातील वेगवेगळ्या जंगलांमध्ये आग भडकली असून याची संख्या जवळपास 600 इतकी आहे. एक महिना झालं जंगलांमध्ये आग भडकली असून याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ओडिसातील मयूरभंज, बलांगीर, काली, हांडी या जंगालांमध्ये गेल्या महिन्याभरापासून आग भडकली आहे. मात्र ही आग विझविण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात नाहीयेत. जवळपास 3 हजार प्रकारची झाडे या जंगालात असून एकट्या ऑर्किडच्या 94 प्रकारच्या प्रजाती आहेत. याशिवाय पाण्यात आणि जमिनीत राहणारे 12 प्राणी, 29 प्रकारचे सरपटणारे प्राणी, 264 प्रकारचे पक्षी, 42 प्रकारचे सस्तन प्राणी सिमलीपाल जंगलात आढळतात.
सिमलीपाल जंगलात बंगाली वाघ, आशियाई हत्ती, गौर, चौसिंगा इत्यादी प्राणी आहेत. याशिवाय इथं असलेल्या सुंदर अशा जोरांदा आणि बेरीपानी धबधब्यांसाठीसुद्धा ओळखले जाते. 2009 मध्ये युनेस्कोकडून याला वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्पेअर रिझर्व्ह म्हणून घोषित करण्यात आलं होतं.
* केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधानांची धाव
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे म्हणणे आहे की, ओडिशातील मुख्य सिमलीपाल टायगर रिझर्व्ह सुद्धा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पर्यावरण मंत्र्यांकडे यासाठी धाव घेतली असून आगीवर लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.
देशात उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. याचाच परिणाम जंगलांमध्ये वणवे पेटण्याच्या घटना घडत आहेत. सिमलीपाल नॅशनल पार्कमध्ये गेल्या 10 दिवसांपासन आग भडकली आहे. सिमलीपाल जंगल हे 1060 स्क्वेअर मीटर परिसरात पसरलेलं नॅशनल पार्क आहे. हे मयूरभंज एलिफंट रिझर्व्हचा एक भाग असून सोबत टायगर रिझर्व्हसुद्धा आहे. त्यामुळे या जंगलाला लागलेली आग चिंतेचा विषय आहे.