मुंबई : एमपीएससीची पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा अखेर 21 मार्चला होणार आहे. याविषयी एका परिपत्रकाद्वारे आज माहिती देण्यात आली आहे. ही परीक्षा आधी 14 मार्चला होणार होती. मात्र ती अचानक रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या आठ दिवसातच ही परीक्षा घेतली जाईल, असे स्पष्ट केले होते.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी एमपीएससी पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वचन दिल्याप्रमाणे, आज एमपीएससीने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची ही पहिली किंवा दुसरी वेळ नव्हती. सलग चौथ्यांदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली. कोरोनाचं कारण पुढे करत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोगाने घेतल्यानंतर राज्यभरात विद्यार्थ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला
एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा उद्रेक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परीक्षेची तारीख जाहीर करणार असल्याचं काल गुरुवारी संध्याकाळी केलेल्या संबोधनात सांगितलं होतं.
कोरोनामुळे एमपीएससीची 14 मार्चला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात परीक्षा होतील, हे मी वचन देतो. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी ठेवावी. वयाची मर्यादा आडवी येणार नाही. उद्याच परीक्षेची नवीन तारीख जाहीर होईल. कोरोनामुळे नाईलाजाने परीक्षा थोडी पुढे ढकलावी लागत आहे. उमेदवारांना होणाऱ्या त्रासाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी म्हटले.
मात्र हे सांगत असताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीवर उद्धव ठाकरेंनी प्रकाश टाकला. आज तारीख जाहीर होऊन येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. येत्या 21 मार्चला ही परीक्षा होणार आहे.