नवी दिल्ली : सध्या कोरोनाच्या नवीन लक्षणांनी डॉक्टरांना घाबरवून सोडले आहे. कोरोना रूग्णांना सामान्यत: ताप आणि श्वास घेण्यात त्रास होत असतो, परंतु मुंबईतील डॉक्टरांना असे रुग्णही आढळले आहेत ज्यांना आतड्यांंत ब्लॉकेज, पोटदुखी आणि अतिसारची तक्रार केली आहे. स्वत: डॉक्टरांना ही लक्षणे पाहून आश्चर्य वाटले.
एका वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार, मुंबईचे सर्जन मुफाझल लकडावाला यांच्याकडे चार असे रूग्ण आढळले ज्यांनी खाण्यापिण्याची तक्रार केली. देशात कोरोना विषाणूचा धोका सातत्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेने देशात प्रवेश केल्याचे संकेत तज्ञांनी व्यक्त केले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या नवीन रुग्णातील सर्वांच्या आतड्यांमध्ये ब्लॉकेज आहे. डॉक्टर म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण आता पोटाची तक्रार करीत आहेत. बऱ्याच रूग्णांत अतिसार, ओटीपोटात दुखणे आणि आतड्यांसंबंधी ब्लॉकेजची लक्षणे दर्शवित आहेत.
* डॉक्टरांची मते, प्रतिक्रिया
माजी केईएम डीन अविनाश सुपे म्हणाले की, त्यांच्याजवळ एक 37 वर्षीय रुग्ण आहे, ज्याला पोटदुखी सोबतच मल साफ होण्यास त्रास होत होता. नंतर जेव्हा त्यांची कोरोना टेस्ट झाली तेव्हा तो पॉझिटिव्ह आला. संसर्गजन्य रोग तज्ञ डॉ. तनु सिंघल म्हणाले की, कोरोना आपला रंग बदलत आहे यात शंका नाही. 2020 च्या तुलनेत हा विषाणू धोकादायक बनला आहे. कोरोनाच्या गंभीर रूग्णांमध्ये मूत्रपिंडांवरही विषाणूचा परिणाम दिसून येत आहे. दरम्यान, ते असेही म्हणाले की, काही रुग्ण आता त्वरित बरे होत आहेत.