देहरादून : दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या सी 4 या बोगीला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. कानसोरो स्थानकाजवळ या गाडीच्या सी 4 डब्यात आग लागली. दरम्यान, ही आग एवढी भीषण होती की यात संपूर्ण डब्बा जळून गेला.
दिल्लीहून देहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसच्या डब्याला (बोगी) आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काही काळापूर्वी येथील कांसरो स्थानकाजवळ घडली आहे. कांसरो स्टेशन राजाजी व्याघ्र प्रकल्पातील कोर एरियामध्ये आहे. याविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा डबा रेल्वेपासून वेगळा करण्यात आला आहे. या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या घटनेमुळे राजाजी व्याघ्र प्रकल्प आणि रेल्वेमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, कांसरो रेंजमधील रेंजर आणि त्यांचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत, तसेच त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.
* बोगी रेल्वेपासून केली वेगळी, अनर्थ टळला
आगीच्या ज्वालांनी वेढलेली बोगी रेल्वेपासून वेगळी करण्यात आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत शताब्दी एक्स्प्रेसचं C4 compartment जळून खाक झालं आहे. दरम्यान, सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिली आहे.
शताब्दी एक्स्प्रेसचा कोच क्रमांक 199400 मध्ये दुपारी 12.20 च्या सुमारास हरिद्वार-देहरादून परिरासत आग लागली होती. मिळालेल्या माहितीनुसार इंजिनापासून 8 व्या क्रमांकाच्या डब्यात ही आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले असून अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. तसेच सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.