नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता किंवा प्रवेश चाचणी किंवा एनईईटी (NEET) 2021 परीक्षा 1 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत वेबसाईट nta.ac.in वर एमबीबीएस प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षेसाठी अर्ज लवकरच सुरू होईल.
या वर्षीपासून नीट युजी परीक्षा 11 प्रादेशिक भाषांमध्ये आयोजित केली जाणार आहे. यात इंग्रजा, दिंदी, आसामी, गुजराती, बंगाली, मराठी, ओडिया, कन्नड, तामिळ, तेलगू आणि उर्दू आदि भाषांचा समावेश असेल. एमबीबीएस / बीडीएस कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी प्रवेश पोर्टल वर नोंदणी करावी लागेल.
यावर्षी बारावीच्या बोर्ड परीक्षेस बसणारे विद्यार्थीदेखील या प्रवेश परीक्षेस पात्र ठरणार आहेत. उमेदवारांनी अर्जासोबत स्कॅन केलेल्या कागदपत्रांची यादी, जसे की दहावी व बारावीची प्रमाणपत्रे, गुणपत्रक, आधार कार्डची छायाप्रत, पासपोर्ट क्रमांक, रेशनकार्ड क्रमांक, बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट आकाराचा स्कॅन केलेला फोटो, स्वाक्षरी आणि डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा द्यावी लागेल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
NEET 2021 हे पेन आणि पेपर पद्धतीने आणि वर्षामध्ये फक्त एकदा आयोजित केले जाईल. पदवीधर वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांचे वय 17 ते 25 वर्षे असणे आवश्यक आहे आणि बारावी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
* अशी करा नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी
नीट यूजी परीक्षेसाठी नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत ntaneet.nic.in संकेतस्थळावर जा. यानंतर उमेदवारांनी प्रथम होम पेजवर जाणे आवश्यक आहे. यानंतर नवीन नोंदणी टॅबवर क्लिक करा. यानंतर अधिसूचनेमधील सूचना काळजीपूर्वक वाचा आणि पुढे जा. यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि सबमिट करा. यानंतर आयडीची रजिस्टर्ज बनवा आणि पुन्हा लॉग इन विभागात जा. मग आपल्या क्रेडेन्शियल्समध्ये की आणि लॉग इन करा. अॅप्लिकेशन फॉर्म डिस्प्ले स्क्रीनवर दिसेल. यानंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि सर्व सहाय्यक दस्तऐवज अपलोड करा. या दस्तऐवजांचे प्रिंटआउट घ्या.