पणजी : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने टीव्ही अँकर संजना गणेशनसोबत लगीनगाठ बांधली. त्याने ट्विटरवरून ही गुडन्यूज दिली. ‘आम्ही नव्या जीवनाची सुरूवात केली आहे. आज आमच्या जीवनातील सर्वात आनंदाचा दिवस आहे’, असं म्हणत बुमराहने लग्नाचे काही फोटो शेअर केले. त्यानंतर चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज (15 मार्च) प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत लग्नाच्या बेडीत अडकला आहे. गोव्यात हा विवाहसोहळा पार पडला. आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात होणार झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.
“Love, if it finds you worthy, directs your course.”
Steered by love, we have begun a new journey together. Today is one of the happiest days of our lives and we feel blessed to be able to share the news of our wedding and our joy with you.
Jasprit & Sanjana pic.twitter.com/EQuRUNa0Xc
— Jasprit Bumrah (@Jaspritbumrah93) March 15, 2021
प्रेम, जर ते योग्य असेल, तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतं, आम्ही दोघं नवीन प्रवास सुरू करत आहोत. आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आहे आणि या नव्या प्रवासाच्या बातमी तुमच्यासोबत वाटताना आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा आनंद तुमच्याशिवाय अपूरा आहे, असे जसप्रीत बुमराहनं लिहिलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“Love, if it finds you worthy, directs your course.”
Steered by love, we have begun a new journey together. Today is one of the happiest days of our lives and we feel blessed to be able to share the news of our wedding and our joy with you.
Sanjana & Jasprit pic.twitter.com/EhXiBPpvHG
— Sanjana Ganesan (@SanjanaGanesan) March 15, 2021
* संजना गणेशनविषयी माहिती
संजना गणेशनपेक्षा बुमराह वयाने लहान आहे. बुमराहचा जन्म 6 डिसेंबर 1993 ला तर संजनाचा जन्म पुण्यात जन्म पुण्यात 6 मे 1991 ला झाला. संजनाचे वडील गणेशन रामास्वामी मॅनेजमेंट गुरु आणि एक लेखक आहेत. तसंच आई डॉक्टर सुषमा गणेशन या वकील आणि फिटनेस कोच आहेत. संजनाचं शालेय शिक्षण पुण्यातील बिशप स्कूलमध्ये झालं. त्यानंतर 2008 मध्ये सिम्बॉयसिसमधून तिने बी टेक पूर्ण केलं. सिम्बॉयसिसमध्ये संजनाने सुवर्णपदक पटकाववलं होतं. कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने आयटी आणि डिजिटल मार्केटिंग कंपनी जॉइन केली. 2013 ते 2014 या कालावधीत संजना सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती.
* अशी आहे बुमराहची लव्हस्टोरी
भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह आज बोहल्यावर चढला. गोव्यात जसप्रीतनं स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन हिच्याशी लग्न केलं आहे. संजना आणि जसप्रीत यांची पहिली भेट इंडियन प्रीमिअर लीग दरम्यान झाली. संजना ही कोलकाता नाइट रायडर्स संघाची स्पोर्ट्स अँकर आहे. आयपीएल दरम्यान झालेल्या भेटीत जसप्रीत व संजना चांगले मित्र झाले आणि हळुहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.