मुंबई : मुंबईतील जुहू गल्ली भागातील अहमद शाही याने आतापर्यंत 30 ते 40 कुत्र्यांना आपल्या विकृतीचे शिकार केल्याची भीती आहे. जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असे निर्लज्ज उत्तर त्याने दिले. 68 वर्षांचा अहमद हा भाजी विक्रेता आहे. पहाटे 3-4 वाजता तो हे कृत्य करत असे. कुत्र्यांना खाण्याच्या बहाण्याने तो जवळ बोलवत असे. त्यानंतर मुक्या प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करत असे.
राज्याची राजधानी मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली असून मादी कुत्र्यावर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अहमद शाह या 68 वर्षांच्या वृद्धाला अटक केली आहे.परंतु या वृद्धाने धक्कादायक दावे केले आहे. डीएन नगरच्या पोलिसांना तो म्हणाला की, जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं बेशरम उत्तर या वृद्ध अहमद शाहीने दिलं आहे.
अहमद शाह (वय 68) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी बॉम्बे अॅनिमल राईट्स संस्थेच्या विजय मोहन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपीने आतापर्यंत अनेक मुक्या प्राण्यांवर बलात्कार केला आहे, असा आरोप फिर्यादीने केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डीएन नगरच्या पोलिसांनी या वृद्धाला काल बुधवारी अटक केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 68 वर्षीय अहमद शाह नावाच्या वयोवृद्धाने अनेक पाळीव तसंच भटक्या कुत्र्यांवर बलात्कार केला आहे. आरोपीने आतापर्यंत 30 ते 40 कुत्र्यांना आपल्या विकृतीचे शिकार केल्याची भीती आहे.
अहमद हा मुंबईतील जुहू गल्ली भागातील रहिवासी आहे. पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास तो हे भयंकर कृत्य करत असे. अहमद भाजी विक्रेता आहे. कुत्र्या-मांजरांना खाण्याच्या बहाण्याने तो जवळ बोलवत असे. त्यानंतर मुक्या प्राण्यांवर लैंगिक अत्याचार करत असे. ही घटना 2020 सालच्या डिसेंबरमध्ये घडली होती. बॉम्बे अँनिमल राईट्स’ या एनजीओतील 45 वर्षीय प्राणी हक्क कार्यकर्ते विजय मोहनानी यांनी व्हिडीओ डिसेंबर 2020 डीएन नगर पोलिसांना दिला होता.
प्राण्यांना खायला देऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याची कबुली आरोपी अहमदने चौकशीदरम्यान दिली. जर मुक्या प्राण्यांना काही आक्षेप नसेल, तर तो गुन्हा होत नाही, असं लंगडं समर्थन अहमदने दिलं असल्याचं पोलीस सांगत आहे.
याप्रकरणी माहिती देताना पोलिस म्हणाले की, आरोपीला अशा प्रकारची दुष्कर्म करण्याची सवय लागली होती. त्याला स्थानिक लोकांनी अनेकदा समज दिली होती. पण त्याने आपलं कृत्य थांबवले नाही. त्यानंतर मोहन यांनी दिलेली तक्रार आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारे डीएन शहर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी वृद्धाला अटक केली आहे.