मुंबई : मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला आज मंगळवारी १० वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. २०१३ ला अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात छोटा राजनला ही शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच त्याला पाच लाखांचा दंडही ठोठावण्यात आला. दरम्यान, छोटा राजनसह अन्य आरोपींना मंगळवारी न्यायालयाने दोषी ठरवले होते.
२०१३ साली अजय गोसालिया यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात छोटा राजनला ही दहा वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला ही शिक्षा सुनावली आहे. छोटा राजनसह इतर आरोपींना मंगळवारी न्यायालयाने दोषी ठरवले. सोबतच छोटा राजनला पाच लाखाचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
बांधकाम व्यावसायिक अजय गोसालियावर मालाड येथे २८ ऑगस्ट २०१३ रोजी तिघांनी गोळीबार केला होता. छोटा राजनच्या सांगण्यावरून हा गोळीबार झाल्याचा सीबीआयचा आरोप होता. सतीश कालिया या आपल्या साथीदारामार्फत छोटा राजनने हा हल्ला घडवून आणला. गोसालिया या गोळीबारात गंभीर जखमी झाला होता. सुदैवाने एक गोळी सोन्याच्या पेंडट लागल्याने गोसालिया या जीवघेण्या हल्ल्यातून बचावला होता.
आधी बुकी असलेला अजय गोसालिया नंतर बांधकाम क्षेत्रात उतरला. २८ ऑगस्ट २०१३ रोजी ५२ वर्षीय गोसालियावर तिघांनी गोळीबार केला होता. मालाड पश्चिमेला असलेल्या मॉलमधून बाहेर येताना हा गोळीबार झाला होता. छोटा राजनच्या इशाऱ्यावरुन हा गोळीबार झाल्याचा सीबीआयचा आरोप होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तपास सुरू झाल्यानंतर ऑगस्ट २०१३ साली बांगूर नगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवण्यात आला. आयपीसीच्या विविध कलमांतर्गत आरोपींविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. काही दिवसांनी या प्रकरणाचा तपास डीसीबीकडे सोपवण्यात आला. या प्रकरणात मोक्का लावण्यात आला.
स्पेशल युनिटने सात आरोपींविरोधात नोव्हेंबर २०१३ मध्ये आरोपपत्र दाखल केले. प्रकाश निकम, सतीश कालिया आणि छोटा राजन हे तीन आरोपी वाँटेड होते. त्यानंतर पत्रकार जे डे हत्या प्रकरणात निकम आणि कालियाला अटक झाली. छोटा राजनला बालीवरुन भारतात आणल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर आज मंगळवारी कोर्टाने छोटा राजनला दहा वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.