बंगळुरु : गेल्या काही दिवसांपासून झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी बॉयने एका तरुणीचं नाक फोडल्याच्या घटनेची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यात त्या तरुणीला सहानुभूती मिळत होती. पण आता उलट त्याच तरुणीवर गुन्हा दाखल झाला आहे. आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं असून आरोप करणाऱ्या हितेशा चंद्रानीवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तरुणीने ऑर्डर रद्द केल्यानं चिडल्यानंतर डिलिव्हरी बॉयनं तिला मारहाण केल्याचा आरोप केला. या प्रकरणी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयला पोलिसांनी अटक केली होती. कामराज असं त्याचं नाव असून सोशल मीडियावर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कामराजला अटक केली होती. आता या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं असून आरोप करणाऱ्या हितेशा चंद्रानीवरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डिलिव्हरी बॉय कामराज याच्यावर मारहाणीचा आरोप करणाऱ्या मॉडेल आणि मेकअप कलाकार हितेशा चंद्रानी हिच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामराज याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आयपीसी कलम ३५५, कलम ५०४ आणि कलम ५०६ असे अनुक्रमे हल्ला, अपमान आणि धमकी या गुन्ह्याखाली एफआयआर दाखल केली आहे. बंगळुरुमधील शहर पोलीस स्थानकात डिलिव्हरी बॉय कामराजने तक्रार दाखल केली आहे.
गेल्या आठवड्यात हितेशा चंद्रानी हिने झोमॅटो कंपनीच्या डिलिव्हरी बॉयवर मारहाण केल्याचा आरोप केला होता. हितेशा हिने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्यावर झालेल्या हल्याचं वर्णन केलं होतं. त्यानंतर या प्रकरणात झोमॅटो कंपनी आणि कर्मचारी कामराजवर देशभरातून टीका करण्यात आली होती. त्यानंतर डिलिव्हरी बॉय कामराजनेही प्रसारमाध्यमांना आणि एका व्हिडीओच्या माध्यमातून व्यथा मांडली. आपली बाजू मांडत आपल्याला कसं खोटं पाडलं जातंय आणि कसा बळीचा बकरा केला जातोय याची कथा मांडली होती.