सोलापूर : मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची तारीख निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. पोटनिवडणूक जाहीर होताच मतदारसंघात आचारसंहिता लागू झाल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून येथील राजकीय वर्तुळात चर्चेत राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा आखाडा अखेर निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला असून, निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज 23 तारखेपासून भरण्यास सुरवात होणार आहे. 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी 6 महिन्यात पोटनिवडणूक घेण्यात येणार होती. त्यानुसार आज निवडणूक अयोगाने पंढरपूरची पोटनिवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून कै.आमदार भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांचे नाव आघाडीवर आहे तर दुसरीकडे समाधान आवताडे, शैलजा गोडसे,प्रशांत परिचारक, अभिजित पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसात कोण कुणाच्या विरोधात उमेदवार असणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे पंढरपूरची विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. रिक्त जागी सहा महिन्यांत निवडणूक घेणे आवश्यक असल्याने गेल्या तीन महिन्यांपासून या राजकीय वर्तुळात अनेकांची नावे चर्चेत होती. परंतु प्रत्यक्षात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर नसल्यामुळे अनेकांनी आपले राजकीय डाव टाकण्यास सुरवात केली. मतदारांशी सातत्याने संपर्क साधला जात आहे. त्यामध्ये घरगुती कार्यक्रमांबरोबर सांत्वन व इतर कार्यक्रमांना हजेरी लावून मतदारांशी जवळीक साधून पोटनिवडणुकीच्या संदर्भात चाचपणी केली जात होती.